मुंबई – अभिनेता हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. लोक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनयापासून ते नृत्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत हृतिकने प्रभुत्व मिळवले आहे. हृतिकला पाहून असे वाटते की तो केवळ अभिनयासाठीच बनला आहे. दरम्यान, नुकतंच अभिनेत्याने एक खुलासा केला आहे की, त्याच्या “कहो ना प्यार है’ या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारण्यासाठी त्याने बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच, “सलमान खान’कडून बॉडीबिल्डिंग टिप्स घेतल्या होत्या. स्वतः हृतिकने याबद्दल खुलासा केला आहे.
हृतिक रोशनने वयाच्या 26 व्या वर्षी वडील राकेश रोशन यांच्या रोमँटिक ड्रामा ‘कहो ना प्यार है’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणापूर्वी हृतिक इतका ‘नर्व्हस’ होता की त्याने 70 मिमी स्क्रीनवर स्वतःला चांगले दिसण्यासाठी त्याच्या क्षमतेनुसार सर्वकाही केले. मात्र, चित्रपटासाठी त्याचे शरीर तयार करू शकला नाही. यासाठी त्याने सलमान खानला फोन करून काही खास टिप्स घेल्या होत्या जेणेकरून तो आपल्या दुहेरी भूमिकेला चित्रपटात योग्य न्याय देऊ शकेल.
मुलाखतीत हृतिक म्हणाला, ‘मला माहित होते की माझे शरीर चित्रपटासाठी खूप महत्त्वाचे आहे. विशेषत: या चित्रपटासाठी, जिथे मी दुहेरी भूमिका करत होते. पहिल्या भागात रोहित आणि दुसऱ्या भागात राज. मला वाटले की दोन पात्रांमधील फरक मी शारीरिकदृष्ट्या देखील दर्शवू शकलो तर ते छान होईल. म्हणून, मी एक वर्ष प्रशिक्षण घेत राहिलो, परंतु मला ज्या प्रकारचे परिणाम पहायचे होते ते मला दिसले नाही. मी माझ्याकडून शक्य ते सर्व केले.
त्यानंतर मी स्वतःला विचारले की इंडस्ट्रीमध्ये कोणाचे शरीर सर्वोत्तम आहे आणि माझ्या मनात पहिली गोष्ट आली ती म्हणजे सलमान खान. मी त्याला कॉल केला आणि विचारले की तू इतकी चांगली बॉडी कशी बनवली आहेस, त्यावर त्याने मला काही टिप्स दिल्या. आणि त्यामुळेच चित्रपट माझे शरीर अतिशय आकर्षक दिसत होते. असं देखील यावेळी हृतिक म्हणाला.