बिग बॉसच्या 13 व्या अवृत्तीच्या लॉन्चिंग कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना सलमानने सांगितले की, रानू मंडल आणि माझा कोणताही संबंध नसून, मला स्वत:लाच घराची समस्या आहे. मी स्वत: एक बेडरुमच्या घरात राहतो. रानू मंडलला ना मी घर दिले आहे, ना गाडी. कुणीतरी मला उध्वस्त करण्याच्या मागे आहे, अशा शब्दात बॉलिवूडचा दबंग खान सलमानने रानू मंडलला घर देण्याबाबतचे वृत्त अफवा असल्याचे म्हटले आहे.
29 सप्टेंबरला बिग बॉस 13 चा ग्रॅंड प्रिमियर होणार आहे. त्यापूर्वी बिग बॉस 23 चे अधिकृत लॉंचिंग करण्यात आले. या वेळी होस्ट सलमान खानने ग्रॅंड एँट्री घेतली. गर्दीतून नाशिक ढोलाच्या तालावर सलमानचे स्वागत करण्यात आले ढोलाचा आवाज ऐकताच सलमानने आपल्या खास शैलीत डान्स केला.
या वेळी सलमानने अनेक प्रश्नांची गमतीशीर उत्तरे दिली. तू बिग बॉसच्या घरात राहू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान म्हणाला की, बिग बॉसच्या घरात राहणे माझ्यासाठी सोपे आहे. कारण बिग बॉसच्या घरापेक्षाही मोठ्या घरांमध्ये मी राहिलो आहे’.