पुणे – सुडौल शरीर व्यक्तींच्या आयुष्यात एक नवा आत्मविश्वास देत असतात. आरोग्यासाठीही हे तितकेच उपयुक्त ठरत असते. त्यामुळे आपापल्या क्षेत्रात नामवंत असणाऱ्या महिला एकत्र येत एक चक्क फिटनेस क्लब स्थापन केला. डझनभर मैत्रिणींनी सुरू केलेल्या या फिटनेस क्लबमध्ये आजमितीला जवळपास 200 सखी व्यायामाचा आनंद लुटत आहेत. ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली आहे, 3S फिटनेस क्लबने…
उच्चशिक्षित महिलांनी एकत्र येत वर्षभरापूर्वी सदाशिव पेठेते “3s फिटनेस क्लब’ची सुरवात केली. वकील, आर्किटेक्ट, सी.ए., डॉक्टर, व्यवसायिक, शिक्षक अशा क्षेत्रातील मैत्रिणी खरे तर समाजकार्यासाठी एकत्र आल्या होत्या. ते करत असतानाच भेडसावणाऱ्या शारीरिक समस्यांचे कारण व्यायामाचा अभाव हे होते. त्यातूनच फिटनेस क्लबची कल्पमा पुढे आली, असे संचालिका सुप्रिया पुंडलिक ढुमे यांनी सांगितले.
गेले वर्षाभरात शेकडो स्त्रियांनी सहभाग घेऊन आपल्या व्ययक्तिक आयुष्यात येणाऱ्या गंभीर समस्यांना जसे की, पी.सी.ओ.डी., वाढते वजन, प्रेगनन्सी, समाजात होणारी घुसमट, काम करणाऱ्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, लग्न, शारीरिक समस्या व कौटुंबिक समस्या अशा अनेक अडचणींवर मात केली आहे.
दिवसातून एकदा एकत्र येऊन शारीरिक व्यायाम, योगा, झुंबा या आणि अशा व्यायामाद्वारे वकील, डॉक्टर, सी.ए., व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील अनुभवी महिलांचे चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन केले जाते. वृक्षारोपण, अनाथालयांना मदत, गरजू महिलांना मदत करणे असे सामाजिक उपक्रमही घेण्यात येतात. तसेच फिटनेस क्लब ला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.