‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात; नवीन आयुष्याला सुरुवात

Marathi Actress Wedding | मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सध्या विवाहबंधनात अडकत आहेत. याचदरम्यान आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत ‘अंजी’ नावाची भूमिका साकारलेली अभिनेत्री कोमल कुंभार हिचा देखील विवाहसोहळा पार पडला.
अभिनेत्री कोमल कुंभारने गोकुळ दशवंतशी लग्न केलं आहे. कोमल आणि गोकुळने लग्नात पारंपरिक लूक केला होता. कोमलने पोपटी रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात नथ, मॅचिंद ज्वेलरी घालून तिने लूक पूर्ण केला होता. तर गोकुळने आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. त्याला मॅचिंग पोपटी रंगाचा फेटा आणि शेलासोबत होता. दोघेही लग्नात सुंदर दिसत होते. या लग्न सोहळ्याला घरातील कुटुंब आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती. Marathi Actress Wedding |
View this post on Instagram
दोन वर्षांपूर्वी कोमलच्या वाढदिवशीच गोकुळने तिला प्रपोज केलं होतं. त्यांच्या प्रपोजलचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. गोकुळची अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत ओळख आहे. त्यांच्या नव्या प्रवासासाठी कलाकारांसह चाहत्यांनी कोमल व गोकुळला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
कोमलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत तिने अंजली (अंजी) ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील अंजी आणि पश्याची जोडी प्रचंड गाजली होती. तसेच ‘अबोली’ मालिकेत सुद्धा ती झळकली होती. Marathi Actress Wedding |
हेही वाचा :





