मुंबई – अभिनेता हृतिक रोशनची (Hrithik Roshan) गर्लफ्रेंड म्हणून अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) सध्या चांगलीच चर्चेत आहे. हृतिक रोशन आणि अभिनेत्री सबा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र या जोडीवर नेटकरी नेहमीच निशाणा साधतात. अनेकदा हे दोघे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. आता पुन्हा एकदा सबा आझाद ट्रोल झाली आहे. त्याचं कारण म्हणजे सबा नुकतेच एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. मात्र तिने केलेल्या अनोख्या कृतीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सबा रॅम्पवॉक करताना दिसते. मात्र अचानक ती गाणं गात आणि डान्स करू लागते. तिचा हा भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला थेट ड्रग्स ॲडिक्ट म्हणत ट्रोल केले आहे. सबाने या लॅक्मेच्या फॅशन इव्हेंटमध्ये, गोल्डन रंगाचं जॅकेट आणि प्लाझो सारखी पँट परिधान केली होती. रॅम्पवॉक गाणं गात ती थेट स्टेजवरच विचित्र डान्स करते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यावर नेटकऱ्यांनी देखील ‘हिला अचानक काय झाले?’, ‘तू ड्रग्ज घेतले का? असा सवाल केला आहे. दरम्यान, सबाला ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि सबा आझाद अर्जेंटिना येथे गेले होते. तेथील हृतिक आणि सबाचे येथील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. यावेळी येथील दोघांचे फोटो अनेकांच्या पसंतीस पडले होते. तर काहींना त्यांना ट्रोलही केले होते. “आपल्या पत्नीला सोडून हृतिक लहान मुलीसोबत फिरत आहे,” असे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले होते.
सबाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, तिने 2008 मध्ये आलेल्या ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, परंतु 2011 मध्ये आलेल्या ‘मुझसे दोस्ती करोगे’ या चित्रपटाद्वारे तिला यश मिळाले. शेवटची ती ‘रॉकेट बॉईज 2’ या चित्रपटात दिसली होती.