पुणे – बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी तसेच, नामांकित पैलवान, ‘मगन बाजीराव बालवडकर’ यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बालवडकर यांनी वयाच्या 64 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
रतन बालवडकर, विजय बाजीराव बालवडकर, संजय बाप्पू बालवडकर यांचे बंधू तसेच, राहुल बालवडकर व पुणे मनपाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचे ते चुलते होते. मगन बालवडकर यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.