प्रख्यात तामिळी दिग्दर्शक के. व्ही. आनंद यांचे निधन

चेन्नाई, दि. 30 – प्रख्यात तामिळी चित्रपट दिग्दर्शक के. व्ही. आनंद यांचे शुक्रवारी मध्यरात्री हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. ते एक उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरही होते. त्यांनी 1994 मध्ये चित्रपटसृष्टीतील कामाला मल्याळम चित्रपटापासून सुरुवात केली. त्यांची सुरुवात सिनेमॅटोग्राफर म्हणून झाली, नंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला.

त्यांनी सन 2005 मध्ये आपला कना कंदेन हा पहिला तामिळी चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांना थेनमाविन कोम्बाथ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेले को, आयन, मातरान, कावन, कप्पन हे चित्रपट खूप गाजले. त्यांच्या निधनाने तामिळी चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले, अशा शब्दांत प्रख्यात तामिळी अभिनेते कमल हसन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.