- चार जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 163 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 88,291 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 163 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये शहाराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच शहरातील चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरात 983 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 163 रुग्णांचाही समावेश आहे.
बुधवारी दिवसभरात शहरात 4 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील दापोडी, कासारवाडी, जाधववाडी, थेरगाव येथील चार रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 105 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 84,950 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1843 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 766 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.