कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या शिबिरातून काल अनेक नेतेमंडळींनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडले. यावेळी एकीकडे छगन भुजबळांनी मराठा आरक्षण व शरद पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर दिले तर दुसरीकडे गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पक्षातील व्यवस्थेवर भाष्य केले. इतकेच काय तर त्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
यावर आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिउत्तर दिल आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, अजितदादांनी मांडलेली भूमिका सत्य कथन करणारी आहे. राऊतांनी राजकीय चोंबडेगिरी करु नये असं म्हणत शेलारांनी टीका केली आहे.