मुंबई – बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये आणखी एक मौल्यवान करचा समावेश केला आहे. रणबीरकडे आधीपासूनच लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग 1.6 कोटी किमतीची कार असून, लँड रोव्हर रेंज रोव्हर स्पोर्ट (87 लाख), मर्सिडीज-बेंझ जी63 एएमजी (2.14 कोटी), ऑडी ए8 एल (1.56 कोटी) अशा महागड्या कार आहे. आता अलीकडेच रणबीरने त्याच्या गॅरेजमध्ये आणखी एक मौल्यवान कारचा समावेश केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या नव्या कार सोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रणबीर कपूरने जी लक्झरी कार खरेदी केली आहे ती रेंज रोव्हरच्या एसई व्हेरियंटची प्रीमियम एसयूव्ही कार आहे. रणबीरने जी कार खरेदी केली आहे ती ग्रे कलरची आहे, जनुकताच रणबीर कपूर देखील या कारसोबत स्पॉट झाला. यादरम्यान, अभिनेता त्याच्या कारशी जुळणारा राखाडी टी-शर्ट आणि कॅप घालून मस्त दिसत होता.
तर तिथे त्यांची नवीन गाडी फुलांनी सजलेली दिसतेय. रणबीरचा त्याच्या नवीन कारसोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नवीन कार खरेदी केल्याबद्दल चाहते रणबीरचे अभिनंदन करताना दिसत आहेत. रणबीरच्या या नवीन लक्झरी कारच्या किंमती सुमारे 4 कोटी आहे.
रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याचा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु ‘गदर 2’ मुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली. आता मात्र रणबीरचा ‘अॅनिमल’ 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.