वुशू स्पर्धेत “राजमाता’च्या खेळाडूंचे यश

भोसरी – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (लांडेवाडी) जुनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद (पुणे) यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत 19 वर्षांखालील व 17 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे – 19 वर्षांखालील मुले – 45 किलो वजन गट – अभिषेक जगताप (12 वी वाणिज्य), 50 किलो वजन गट – वैभव कोरडे (12 वी वाणिज्य), 65 किलो वजन गट – अक्षय यादव (11 वी विज्ञान), 70 किलो वजन गट – रोहन राठोड (11 वी वाणिज्य), 75 किलो वजन गट – शुभम सिंह (11 वी विज्ञान).

17 वर्षांखालील मुले – 70 किलो वजन गट – विवेक राक्षे (11 वी विज्ञान), 75 किलो वजन गट – गणेश पवार (11 वी वाणिज्य), 19 वर्षांखालील मुली – 45 किलो वजन गट – चित्रा रोकडे (12 वी वाणिज्य), 56 किलो वजन गट – अश्‍विनी बोत्रे (12 वी वाणिज्य).

17 वर्षांखालील मुली – 45 किलो वजन गट – मानसी गायकवाड (12 वी वाणिज्य), 54 किलो वजन गट – सालिया मुजाहिद (11 वी वाणिज्य). विजेत्या 11 खेळाडूंची बारामती येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.