Rajasthan Election 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता गेहलोत आणि मुलगा वैभव गेहलोतही उपस्थित होते. सीएम गेहलोत यांनी आज सहाव्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी राजस्थान हे मागासलेले राज्य म्हणून ओळखले जात होते पण आज राजस्थान पूर्णपणे बदलले आहे.
#WATCH | Rajasthan CM Ashok Gehlot files nomination from the Sardarpura Assembly constituency for the upcoming Assembly elections in Rajasthan. pic.twitter.com/sgpDCF0YJA
— ANI (@ANI) November 6, 2023
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज नामनिर्देशन पत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकही कार नाही. त्यांनी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे फक्त 20 हजार रुपये रोख आहेत, तर त्यांच्या पत्नी सुनीता गेहलोत यांच्याकडे 10 हजार रुपये रोख आहेत. गेहलोत यांच्याकडे विविध बँकांमध्ये एकूण 1,93,23,627 रुपये जमा आहेत. गेहलोत यांच्यावर 4 खटले आहेत पण त्यांना एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.
VIDEO | “I have fulfilled my duties as a ‘pratham sevak’. Whatever I have learned through my experience in Jodhpur, I have given it for the service of Rajasthan. Now it is up to the people to decide,” says CM @ashokgehlot51 after filing nomination from Sardarpura constituency for… pic.twitter.com/VqDz6SYhct
— Press Trust of India (@PTI_News) November 6, 2023
दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सीएम गेहलोत यांच्यावर कोणतीही थकबाकी नाही. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांवर बँकेचे कर्ज नाही की सरकारी कर्ज नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जंगम मालमत्ता 1,95,23,627 रुपये आहे. सीएम गेहलोत यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मण सिंह गेहलोत आहे. गेहलोत यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे. सीएम गेहलोत यांच्याकडे फ्रीज, एअर कंडिशनर, कलर टीव्ही, म्युझिक सिस्टम आणि आयफोन आहे.
VIDEO | Rajasthan CM Ashok Gehlot takes his sister’s blessings before filing nomination from Sardarpura constituency for the upcoming state Assembly elections.
(Source: Third Party)#RajasthanElections2023 #AssemblyElectionsWithPTI #AssemblyElection2023 pic.twitter.com/lEYa4WRalq
— Press Trust of India (@PTI_News) November 6, 2023
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज सांगितले की, या निवडणुकांमध्ये वातावरण आमच्या बाजूने आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नाही. त्यांना कोणतेही आरोप करता येत नाहीत म्हणून ते खोटे आरोप करत आहेत. ते आमच्या कर्तृत्वावर चर्चा करत नाहीत. आम्ही एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळीही राजस्थानात काॅंग्रेसचेच सरकार येईल. दरम्यान, राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निकालाची 3 डिसेंबर रोजी जाहीर होईल.