आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ
मंचर- आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांनी शुक्रवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज दाखल केला.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे बाणखेले यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, सरपंच दत्ता गांजाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखेले, डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा बॅंकेच्या माजी संचालिका जयश्री पलांडे, युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर, महिला आघाडीच्या अध्यक्षा मालती थोरात, प्रीती थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.