लोणंद -फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी गावच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लोणंद पोलिसांनी छापा टाकून तेरा जुगारींवर कारवाई केली. यावेळी रोख रक्कमेसह सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, शुक्रवार, 24 रोजी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास डोंबाळवाडी गावात जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजुस मनोज नरसिंह पवार (रा. सोमवारपेठ फलटण) यांचे शेतात विटभट्टी जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार सुरु असल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर सपोनि संतोष चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकला असता एकूण तेरा जुगारींवर कारवाई करून रोख रक्कमेसह मोटारसायकल, मोबाईल फोन व चारचाकी असा एकूण चोवीस लाख बावीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत मनोज मोहन कोकरे (वय 29, रा. पणदरे ता. बारामती), गणेश विठ्ठल कांबळे (वय 36, रा. वडगाव निबाळकर ता. बारामती), उमेश रमेश खरात (वय 40, रा. लोणंद, ता. खंडाळा), रामचंद्र बबन कर्नवर (वय 54, रा. गुळंचे ता. पुरंदर).
बाळासो किसन मदने (वय 35, रा. निरा वाघज ता. बारामती), जगन्नाथ सखाराम मदने (वय 50, रा. मिरेवाडी, ता.फलटण), रुपेश राहुल कांबळे (वय 32, रा. निंभारे, ता. फलटण), महेश भालचंद्र भागवत (वय 34, रा. बाळासाहेबनगर लोणंद, ता. खंडाळा), सुनील धुमसेन सोनवणे (वय 58, रा. पिंपरे खु. ता. पुरंदर), दत्तात्रय पोपट गायकवाड (वय 28, रा. पणदरे ता. बारामती), सुरेश आनंता भुजबळ (वय 66, रा. वाल्हे ता. पुरंदर), सागर सुरेश खंडाळे (वय 33, रा. वडगाव निंबाळकर.
ता.बारामती), मनोज नरसिंग पवार (वय 33, रा. सोमवारपेठ ता. फलटण) अशा तेरा जणांवर जुगारप्रकरणी तसेच करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईत सपोनि संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र पाडवी, ज्ञानेश्वर मुळीक, मल्हारी भिसे, फैयाज शेख, श्रीनाथ कदम, अविनाश शिंदे, केतन लालगे, होमगार्ड संतोष इंगवले, ओमकार कोळी, भिकू येळे, जयदीप भोईटे यांनी भाग घेतला.