कोईम्बतूर (तामिळनाडू), – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार दौऱ्यातून थोडा वेळ काढत शुक्रवारी रात्री तामिळनाडुच्या सिंगनाल्लूर येथील एका मिठाईच्या दुकानाला भेट देऊन तेथे मिठाई खरेदी केली. राहुल गांधी यांच्या या अचानक आणि अघोषित भेटीमुळे मिठाईच्या दुकानाचे मालक बाबू आश्चर्यचकित झाले. (Rahul Gandhi Takes ‘Sweet’ Detour Amid Poll Campaign In TN, Enjoys Gulab Jamun, Buys Mysore Pak For CM Stalin)
Shri @RahulGandhi gifts famous Mysore Pak to Shri @mkstalin.
Celebrating the loving relationship he shares with the people of Tamil Nadu. pic.twitter.com/Lw8vYrCC8L
— Congress (@INCIndia) April 12, 2024
ते म्हणाले की, अचानक राहुल गांधी आमच्या दुकानात आल्याने आम्हाला आनंदाने आश्चर्य वाटले. त्यांना गुलाब जामुन आवडत असल्याने, त्यांनी एक किलो मिठाई विकत घेतली. त्यांनी प्रदर्शनात असलेल्या इतर मिठाईचेही नमुने घेतले. त्यांनी खरेदी केलेल्या मिठाईचे त्यांनी पुर्ण पैसेही भरले.
राहुल यांच्या भेटीमुळे आश्चर्यचकित झालेल्या तेथील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या भोवती गर्दी करीत त्यांच्या समवेत सेल्फी घेतले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व द्रमुक नेते स्टॅलिन यांच्यासाठीही मिठाई खरेदी केली आणि ती त्यांना भेट दिली. त्यावर प्रतिक्रीया देताना स्टॅलिन म्हणाले की राहुल गांधी यांनी आजच मिठाई वाटली आहे याचा अर्थ येत्या ४ जुनला इंडिया आघाडी मिठाई वाटणार आहे.