infinix note 40 pro 5g – टेक कंपनी इन्फिनिक्सने बजेट सेगमेंटमधील इन्फिनिक्स नोट 40 प्रो 5जी आणि इन्फिनिक्स नोट 40 प्रो + 5जी हे एका मालिकेतील दोन फोन लाॅंच केले आहेत. या दोन्ही फोनमध्ये 6.78 इंचाचा 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले, 108 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. दोन्ही स्मार्टफोन 20W च्या वायरलेस चार्जिंग सिस्टिम देण्यात देण्यात आली आहे. तसेच रिव्हर्स चार्जिंग सुविधाही देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन टायटन गोल्ड आणि विंटेज ग्रीन अशा दोन रंगामध्ये भारतीय बाजारात लाॅंच करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट या ई काॅमर्स वेबसाईटवर हा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
किंमत –
इन्फिनिक्स नोट 40 प्रो 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 21999 रुपये तर या स्मार्टफोनची 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज ची किंमत 24999 रुपये आहे.
स्मार्टफोनची वैशिष्ट्ये –
डिस्प्ले – इन्फिनिक्स नोट 40 प्रो सीरीज दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड 3 डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पीक ब्राईटनेस 1300 नीट्स आणि 1080×2436 रेझोल्यूशन आहे.
कॅमेरा – फोटोग्राफी आणि व्हिडीओ रेकाॅर्डिंगसाठी स्मार्टफोनमध्ये मागील पॅनलवर क्वाड सेटअपमध्ये प्लॅश लाइटसह 108MP+2MP+2MPचा कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
बॅटरी – इन्फिनिक्स नोट 40 प्रो मध्ये 45W चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे, तर इन्फिनिक्स नोट 40 प्रो + 5जी मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4600 mAh बॅटरी आहे. दोन्ही स्मार्टफोनसोबत 20W वायरलेस चार्जर असेल.
OS आणि प्रोसेसर: इन्फिनिक्स नोट 40 प्रो 5जी सिरीजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7020 प्रोसेसर आहे, जो अॅंड्राॅइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.