वाघोली – तत्कालीन आमदार विलास लांडे यांच्या पाठपुराव्याने वाघोली मध्ये गोरगरिबांच्या मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हवेलीचे युनिट मंजूर करण्यात आले होते. यासाठी वाघोली मध्ये ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने साडेतीन एकर जागा प्रशिक्षण संस्थेसाठी आठ वर्षांपूर्वी देण्यात आली होती. मात्र या जागेवर अद्यापही कोणताही निधी नसल्याने इमारत उभी राहिली नसल्याने सध्या ही आयटीआय आठ वर्षापासून पेरणे फाटा या ठिकाणी एका मंगल कार्यालयामध्ये भाड्याच्या जागेत असून महिन्याला जवळपास दोन लाख रुपये जागा भाडे देऊन सुद्धा विद्यार्थ्यांना दररोज गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
वाघोली येथे जवळपास साडेतीन एकर जागा मंजूर झाल्यानंतर या जागेसाठी साठी या ठिकाणी आयटीआय कार्यान्वित होणार होती. तोपर्यंत वाघोली ची आयटीआय पेरणे फाटा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहे.मात्र आठ वर्षांमध्ये भाड्यापोटी शासनाने दिलेली रक्कमच कोट्यावधींच्या घरात पोहोचली आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. ही बाब फियाट कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी वाघोली आयटीआयच्या जागेची पाहणी करून त्या ठिकाणी अद्यावत अशी शेडची उभारण्यासाठी मदत करण्याची आश्वासन आयटीआयच्या प्राचार्य व इतर प्रतिनिधींना दिले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे,फियाट कंपनीचे प्रतिनिधी राकेश बावेजा,संतोष गोसावी, अमोल फटाले, आर्किटे्क गिरीश खिरे,सचिन कदम, निलकंठ जगताप सर आदींनी पाहणी मान्यवर उपस्थित होते. वाघोली चे सामाजिक कार्यकर्ते किशोर सातव यांनी आयटीआय प्रशिक्षण संस्था वाघोली येथे लवकरात लवकर उभी राहावी यासाठी पाठपुरावा केला आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दयनीय अवस्था..
वाघोलीची औद्योगिक प्रशिक्षण संस्था सध्या पेरणे फाटा येथे सुरू असून या संस्थेत 250 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्लासरूमची व्यवस्था नाही, बाथरूमची सोय नाही. पिण्याचे पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे.
तात्कालीन आमदार विलास लांडे यांच्या पाठपुराव्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाघोलीत मंजूर झाली. ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून साडेतीन एकर जागा ठरावाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी देण्यात आली. सध्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत वाघोलीत उभी राहावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
– रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे
हवेली प्रशिक्षण संस्थेच्या वाघोली या जागेत इमारतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
– संतोष गोसावी, प्राचार्य, आयटीआय हवेली