वाघोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारला यशस्वीरित्या ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने मोदी@9 अंतर्गत वाघोली येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने बाईक रॅली व युवा संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपच्या वतीने महा-जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिरूर लोकसभा प्रमुख आमदार महेश लांडगे, शिरूर हवेली विधानसभा प्रमुख प्रदिप कंद व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघोली परिसरात बाइक रॅली काढण्यात आली. तसेच वाघोली श्रेयस मंगल कार्यालय येथे पुणे ग्रामीण आयोजित युवा संवाद संमेलन संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी सरकारने नऊ वर्षांत केलेल्या विविध कामांची योजनांची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. भाजपयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी मार्गदर्शन करताना विविध योजना बाबत माहिती दिली तर तरुण सहकाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,हवेली भाजपा तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, युवा मोर्चा प्रदेश महामंत्री अनुप मोरे, सुदर्शन पाटसकर, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, कृ.उ.बा. स.संचालक सुदर्शन चौधरी,विजय हरगुडे, प्रिया पवार , युवा मोर्चा जिल्हा प्रभारी अजित कुलथे, सचिन जायभाये, शाम गावडे, अमोल शिवले, सूरज चव्हाण, मुन्नाभाऊ राखपसरे, उमेश मोरे, स्वप्नील कंद, गौरव झुरूंगे, ओंकार कंद, गणेश सातव, विजय जाचक, प्रदिप सातव,अविनाश सातव, विलास सातव, अनिल सातव, दिनेश झांबरे, सचिन हरगुडे, प्रशांत सातव, अविनाश कुटे, यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश कुटे,पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप सातव यांनी केले होते