पुणे -“आर्य संगीत प्रसारक मंडळा’च्या वतीने आयोजित 69 व्या “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त यंदा सहभागी कलाकारांची नावे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. येत्या 13 ते 17 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे हा महोत्सव होणार आहे.
हे वर्ष पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या तीनही दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकार यावर्षी महोत्सवात आपली कला सादर करतील असेही जोशी म्हणाले. पूर्वीप्रमाणे यंदा महोत्सवाची सुरूवात ही सनईवादनाने होणार आहे. ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर हे सनई सादर करणार आहेत.
पहिल्यांदाच कला सादर करणारे कलाकार
- अंकिता जोशी
- पार्था बोस
- रजत कुलकर्णी
- प्राजक्ता मराठे
- ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी
- पौर्णिमा धुमाळे
- यामिनी रेड्डी आदी.
महोत्सवाची वेळ आणि कार्यक्रम
- 13 डिसें. – दु. तीन ते रात्री 10, गायन – संजय गरूड, कलापिनी कोमकली, पं. उल्हास कशाळकर, वादन – तेजेंद्र नारायण मुजुमदार (सरोदवादन)
- 14 डिसें. – दु. चार ते 10, गायन – अंकिता जोशी, पं. उपेंद्र भट, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, वादन – पार्था बोस (सतारवादन)
15 डिसें. – दु. चार ते 10, गायन – रजत कुलकर्णी, पद्मा देशपांडे, पं. अजय पोहनकर, अभिजीत पोहनकर, वादन – नीलाद्री कुमार( सतारवादन) - 16 डिसें. – दु. चार ते रात्री 12 (रात्री 12 पर्यंत महोत्सवाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी परवानगी दिली आहे. गायन – प्राजक्ता मराठे, बेगम परवीन सुलताना, वादन – अभय सोपोरी (संतूरवादन), नृत्य – यामिनी रेड्डी (कुचिपुडी), जुगलबंदी – देबप्रिय अधिकारी (गायन) आणि समन्वय सरकार (सतारवादन).
- 17 डिसें – दु. 12 ते रात्री 10, गायन – श्रीनिवास जोशी, पौर्णिमा धुमाळे, पं. सुहस व्यास, कौशिकी चक्रवर्ती, डॉ. प्रभा अत्रे (समारोप), वादन – रोणू मुजुमदार (बासरीवादन), ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी यांचा कर्नाटक शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम.