पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने मंगळवारी (दि.1)गौरविले जाणार आहे. या व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. “या कार्यक्रमासाठी आयोजकांना मी स्वत:च पंतप्रधानांची वेळ मिळवून दिली आहे, त्यामुळे तेथे जाणे हा माझा नाईलाज आहे,’ असे पवार यांनी सांगितल्याचा दावा युक्रांदचे डॉ.कुमार सप्तर्षी यांनी केला.
दरम्यान पवार यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि ठाकरे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती करण्यात आली असली तरीही शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यावर ठाम आहेत, अशी माहिती डॉ. सप्तर्षी यांनी दिली.