पुणे -पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले. तसेच गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल, यावर भर दिला. त्याप्रमाणे सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यांचे मार्गदर्शनाखाली शनिवारी मोक्का अंतर्गत १०० वी कारवाई पार पडली. सन २०२३ या चालू वर्षातील ही १०० वी कारवाई आहे. आता पर्यत १०० मोक्का केसेसमध्ये एकूण ६४९ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
– शंभरवा मोक्का बिबवेवाडीतील टोळीला पोलीस आयुक्तांनी शंभरावा मोक्का बिबवेवाडीयेथील टोळीस लावला आहे. या टोळीतील सदस्यांनी ८ नोव्हेंबर रोजी अप्पर-बिबवेवाडी येथे एका तरुणावर लोखंडी रॉड व बांधकामासाठी वापरण्यात येणारी लाकडाची फळीने त्याचे दोन्ही हाताचे मनगटावर, दोन्ही पायाचे गुडघा व नडग्यांवर, पोटावर व डोक्यात वार करुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर व पंकज दिवेकर (सर्व रा. अप्पर बिबवेवाडी पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयांचे तपासा दरम्यान आरोपी तेजस जगताप, अनिकेत काटकर यांना अटक करण्यात आली असुन ते सद्या येरवडा जेल पुणे येथे आहेत. तसेच आरोपी सौरभ शिंदे , चंदर राठोड, पंकज दिवेकर हे फरार आहेत. आरोपी सौरभ शिंदे (टोळी प्रमुख) याने टोळीमधील सदस्यांना बरोबर घेवुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, बेकायदेशीर घातक शस्त् जवळ बाळगणे, दरोडा या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली आहे. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत.
यातील आरोपीं विरुध्द वेळोवेळो प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. यामुळे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ पाच) आर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, उप आयुक्त आर राजा, सहायक आयुक्त शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सविता ढमढेरे, उप-निरीक्षक बाळु शिरसट, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे व कृष्णा फुले यांनी केली आहे.
जवळ बाळगणे, दरोडा या गुन्हयाद्वारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली आहे. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. यातील आरोपीं विरुध्द वेळोवेळो प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. यामुळे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे यांनी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ पाच) आर. राजा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा, उप आयुक्त आर राजा, सहायक आयुक्त शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सविता ढमढेरे, उप-निरीक्षक बाळु शिरसट, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार दैवत शेडगे, अनिल डोळसे व कृष्णा फुले यांनी केली आहे.