pune news – नवले पुलावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी मनुष्यहानी झाली नाही. मात्र घटनेत चौघे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान सकाळीही परिसरात एक वाहन अपघातग्रस्त झाले.
सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अभय महाजन यांनी सांगितले, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजस्थान पासिंगचा एक कंटेनर मुंबईच्या दिशेने चालला होता. यावेळी नवले पुलाच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढील तीन ते चार वाहनांना धडक दिली. यामध्ये एका पिकअप व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर इतर तीन चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले. वाहनांमधील चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाने क्रेन आणून वाहने बाजूला घेतली. तोवर काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सातारा ते मुंबई कडे जाणारा कंटेनर क्र.RJ 09 GC 8294 हा भूमकर ब्रीज येथे उतारावर नियत्रंण सुटल्याने हायवे चे डिव्हायडर दुरुस्ती चे काम करत असलेला बोलेरो टेम्पो यास पाठीमागून जोरदार धडक देऊन पुढे असलेले शिवशाही बस, दोन कार धडक देत, पुढे डस्ट घेऊन जाणारा ट्रक ला धडक दिल्याने डस्ट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आहे.
अपघातामध्ये कंटेनर ने एकूण 5 वाहनांना धडक दिली आहे. अपघातामध्ये 3 इसम जखमी आहेत, त्यांना नवले हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. अपघात ग्रस्त सर्व वाहने NHAI कडील 2 क्रेन चे साहाय्याने बाजूस काढून घेतली आहेत, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.