पुणे : पत्रकार असल्याची बतावणी करून लष्कर भागातील एका व्यावसायिकाकडून दरमहा हप्ता मागणाऱ्या तीन जणांविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भूषण साळवे (४५), संदीप रासकर (वय ४३), अक्षय वाघमारे (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजेश जनार्दन श्रीगीरी (रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळवे याने श्रीगीरी यांच्या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने पत्रकार असल्याचे सांगितले, बालाजी सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविता. दरमहा हप्ता द्या.
अन्यथा वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करू, अशी धमकी साळवेने श्रीगिरी यांना दिली. साळवेचा सहकारी संदीप रासकर याला दरमहा तीन हजार रूपये द्यावे लागतील, अशी धमकी देऊन साळवेने श्रीगिरी यांच्याकडून सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर वाघमारे श्रीगिरी यांना भेटला. त्याने श्रीगिरींकडे पैशांची मागणी केली.