जवळार्जुन – जेजुरी ग्रामीण व शहर परिसरामध्ये महावितरणकडून 65 शेतीपंपांचे अनधिकृत वीजजोड तसेच व्यावसायिक 42 असे एकूण 107 अनाधिकृत वीजजोड काढून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. वीज चोरांना आळा बसवण्यासाठी नीरा उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत परिसरातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी वीज चोरीस आळा बसविण्यासाठी पथक तयार करून धडक कारवाई करण्यात आली.
आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यांविरोधात ‘महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणाऱ्या तसेच वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनीही सहकार्य करावे,
तसेच अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येत आहे मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली तसेच आकडे काढण्यात आले.