पिरंगुट : येथील गणपती मंदिरात मोरया गोसावी यांचा 462 संजीवन समाधी महोत्सव संपन्न उत्साहात झाला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संजीवन समाधी दिनानिमित्त श्री गणपती देवस्थान पिरंगुट तर्फे श्री मोरया गोसावी यांची पालखीतून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. ठिकठिकाणी रांगोळी व फुलांच्या पायगड्या टाकून पालखीचे स्वागत केले. श्री चिंतामणी व श्री मोरया गोसावी ह्यांचे विधीवत अभिषेक पूजा, सहस्त्र आवर्तन, भजन, किर्तन असे दिवसभर धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठे साठी आमंत्रण निमित्त अक्षदा कलश मिरवणूक काढण्यात आली व विधिवत पूजा करुन गणपती मंदिरात दर्शना साठी ठेवण्यात आला.
ट्रस्ट तर्फे मुख्य विश्वस्त शशांक श्रीकांत देव, विश्वस्त गणेश विनायक देव, प्रकाश गजानन देव, श्रीधर गजानन देव ह्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
पिरंगुट (ता. मुळशी) : श्री मोरया गोसावी यांचा 462 संजीवन समाधी महोत्सवानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली.