दोन ट्रॉफीज पटकाविल्या
पाबळ – दरवर्षीप्रमाणे डीइएसने आयोजित केलेल्या सायन्स प्रोजेक्ट कॉम्पिटिशन 2024″ मध्ये बालाजी स्कूलने सर्वोत्तम प्रोजेक्ट म्हणून प्रथम क्रमांक तर सर्वात उत्तम स्पष्टीकरण अशा दोन ट्रॉफीज संपादित केल्या.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटर स्कूल सायन्स प्रोजेक्ट कॉम्पिटिशन 2024″ मध्ये बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलने दोन प्रोजेक्ट सादर केले होते. यामध्ये एक ‘वेस्ट मॅनेजमेंट’ तर दुसरा प्रोजेक्ट हा ‘सोलर इरिगेशन इन अर्बन अँड रुरल एरिया’ या विषयांवर आधारित होता.
यामध्ये सहभागी झालेल्या शाळांमध्ये बालाजी स्कूलने सर्वोत्तम प्रोजेक्ट म्हणून प्रथम क्रमांक तर सर्वात उत्तम स्पष्टीकरण अशा दोन ट्रॉफीज संपादित केल्या. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
विज्ञान शिक्षिका योगिता मुळे व प्रियंका जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन सदाशिव पवार, प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.