वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांचे यांचे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
वाघोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शांताराम कटके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, आबिद शेख व इतर मान्यवरांनी मराठा समाजासाठी आंदोलन करून न्याय मिळवून दिला याबद्दल जरांगे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल त्यांना पेढा भरवून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी वाघोलीकरांनी केलेल्या स्वागताने मनोज जरांगे पाटील भारावले. व त्यांनी मराठा समाजासाठी यापुढील काळात लढा देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. मराठा समाजासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करताना ग्रामस्थांना मोठा आनंद झाल्याची भावना सोमनाथ आव्हाळे यांनी व्यक्त केली.