हडपसर मतदारसंघातील नागरिकांशी साधला संवाद
दंत चिकित्सकांसह जनजागृती मोर्चात
हडपसरव – महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी शनिवारी (दि. 6) अनेक ठिकाणी प्रचारादरम्यान भेटी दिल्या. त्यात हडपसर मतदारसंघातील काळेपडळ येथील ड्रीम आकृती सोसायटीला भेट देत नागरिकांशी संवाद साधून अडिअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शंतनू जगदाळे, उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे, महिला उपाध्यक्ष रोहिणी क्षीरसागर आदी उपस्थित होते, तसेच हडपसर मुंहमदवाडी येथील राजेंद्र साधू घुले यांच्या मातोश्रीच्या तेरावा विधिस, हडपसर मतदारसंघातील सातवनगर, हंडेवाडी रोड येथे भेट देण्यात आली. तसेच माजी खासदार वैष्णवी सातव, योगेश सातव, जोत्स्ना सातव, विलास सातव परिवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पाटील कुटुंबीयांनी दादांचे औक्षण केले.
यावेळी आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक नाना भानगिरे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वैष्णवी, महेश सातव, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष मीना अशोक कट्टीमनी आदी उपस्थित होते. तसेच माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवासस्थानी, गोंधळीनगर येथील राष्ट्रवादीचे राहुल होले यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे, माजी नगरसेवक मारुती तुपे, राजलक्ष्मी भोसले, शिवसेनेचे अभिजित बोराटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, शनिवारी वर्ल्ड ओरल हेल्थ डेच्या निमित्ताने आय. डी. ए.फ तर्फे आजोजित हडपसर येथील दंत चिकित्सकांसह जनजागृती मोर्चात भाग होऊन उपस्थित तरुण वर्गाशी हितगुज साधत नव्या पिढीचे नवे विचार जाणून घेतले.
तुम्हाला नक्की खासदार करणार
मुहम्मदवाडी येथिल रूनवाल सिगल सोसायटी, सातवनगर हंगेवाडी रोड, तुकाई टेकडी येथिल विठ्ठल विचारे यांच्या कार्यालयास तसेच विविध ठिकाणी भेट दिली. दरम्यान प्रत्यक्ष काही ठिकाणी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. सातवनगर हंगेवाडी रस्ता येथील परिसरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी नागरीकांनी आम्ही तुम्हाला नक्की खासदार करणार असा विश्वास दिला. रूनवाल सिगल सोसायटीतील अभिनव प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी अध्यक्ष राज जाधव, सचिव अभय जाधव, खजिनदार शिवाजी खटके, रमेश अय्यर आदी उपस्थित होते.