सभापती भालेराव : मंचर बाजार समितीची वार्षिक सभा
मंचर – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज चांगले असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि पुढेही देणार आहे, असे प्रतिपादन सभापती वसंतराव भालेराव यांनी केले.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती वसंतराव भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी माजी सभापती प्रकाश घोलप, उपसभापती सचिन पानसरे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपान नवले, बाजार समितीचे संचालक शिवाजी ढोबळे, राम गावडे, जे. के. थोरात, सोमनाथ काळे, नीलेश थोरात,
संदीप चपटे, अरुण बांगर, संदीप थोरात, गणेश वायाळ, रत्ना गाडे, मयुरी भोर, सखाराम गभाले, लक्ष्मण बाणखेले, राजूशेठ भंडारी, सुनील बाणखेले, अरुण हगवणे, सचिव सचिन बोऱ्हाडे यांसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. यावेळी चर्चेत प्रशांत इंदोरे, नवनाथ शिंदे, दीपक पोखरकर, शामराव टाव्हरे, के. के. थोरात, बाबासाहेब खालकर, दत्ताशेठ थोरात, बाळासाहेब बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे, रमेश खिलारी, गणपतराव इंदोरे सहभाग घेतला. प्रास्ताविक उपसभापती सचिन पानसरे यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. अहवाल वाचन सचिन बोऱ्हाडे आणि आभार अरुण बांगर यांनी केले.
पायाभूत सुविधांसह नवीन सुविधा देणार
मंचर येथे नवीन जागा विकत किंवा भाड्याने घेऊन शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे. धना, मेथी, भाजीपाला बाजार पुरवठा चालू करणे, मुख्य बाजार आवारातील किरकोळ दुरुस्ती, खड्डे बुजविणे, 50 मेट्रिक इलक्ट्रिक वजन काट्यास वीस वर्षाहून अधिक काळ झाल्यामुळे या वजन काट्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत असल्यामुळे नवीन साठ मेट्रिक टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसवणे. चांडोली खुर्द येथे नवीन उपबाजार प्लॅन तयार करणे.
यामध्ये शीतगृह, आडत व कमर्शियल गाळे, ग्रेडिंग व पॅकेजिंग सेंटर उभारणे. लोणी उपबाजार येथे नवीन प्रवेशद्वार, कार्यालय नूतनीकरण, पाण्याच्या टाकीचे व्यवस्था करणे, तळघर येथे नवीन उपबाजार उभारणी करताना त्या परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे वसंतराव भालेराव यांनी सांगितले.