बारामती – फ्रेश फूड मार्ट या ड्रायफ्रूट शॉपला अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. नामांकित सूत्रसंचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी कलवा रस्ता येथे फ्रेश फूड मार्टची दुसरी शाखा दसर्याच्या दिवशी सुरू केली आहे ज्याचे उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले होते. यावेळी या शॉपमधील प्रत्येक गोष्टीची बारकाव्याने माहिती घेत कोणते ड्रायफ्रूट कोठून येते,
कोणत्या ड्रायफ्रूटचा काय फायदा आहे तर कोणत्या ड्रायफ्रूटला जास्त मागणी आहे या सर्व गोष्टींची माहिती घेतली. शिवाय भटिंडा पंजाबवरून येणार्या गूळ गजक चिक्कीचा आस्वाद घेऊन त्याचे मनभरून कौतुकही अजित पवार यांनी केले.
कोविड काळात समोर उभी राहिलेली संकटे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असणार्या जगताप परिवाराने तीन वर्षांत दुसरी शाखा निर्माण केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले, महत्त्वपूर्ण सल्लाही दिला आणि भविष्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या.