पुणे – खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात सहकारनगर पोलीसांना यश मिळाले असून वैभव उर्फ बब्लू कोठारी व सलमान ऊर्फ सल्ल्या हमीद शेख (वय २४ वर्षे रा. चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी) अशी जेरबंद करण्यात आलेल्या सराईंतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.२५/१०/२०२३) रोजी रात्री ०८.३० च्या सुमारास बालाजीनगर येथील पेट्रोल पंप जवळ फिर्यादी आकाश मारुती सोनावणे यास जुन्या भांडणाच्या कारणावरून भांडणात मध्यस्थी करतोस काय? जास्त शहाणा झालास का? याला मारून टाकू, याला आता संपवायचाच, असे बोलून बबलू कोठारी, सल्या शेख, सनी जाधव यांनी संगनमत करून जिवे मारण्याच्या हेतुने कोयत्याने वार करत व हातातील कोयते, बांबू हवेत फिरवून परिसरात आम्हीच इथले भाई आहोत, कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत करत सर्वजण नाडीवर बसून तेथून निघून गेले होते.
या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र सर्व आरोपी फरारी होते. दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आरोपी वैभव उर्फ बब्लू कोठारी यास अरण्येश्वर मंदिर येथून ताब्यात घेत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
तसेच याच गुन्हयातील फरार असलेला सराईत गुन्हेगार सलमान उर्फ सल्या शेख याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना खात्रीशीर बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी नागे सल्या शेख हा घातक हत्यारासह के. के. मार्केट येथील पेट्रोल पंपाशेजारी कोणाची तरी वाट पाहत असून तो काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या सुचनेनुसार व पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे व अंमलदार यांच्या पथकाने बातमीच्या ठिकाणी जावून छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले.
त्यास नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सलमान ऊर्फ सल्ल्या हमीद शेख (वय २४ वर्षे रा. चैत्रबन वसाहत गल्ली नंबर ११ माताजी सुपर नार्केट समोर अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशीत त्याचे कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्यावर सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून सदर गुन्हा अनुशंगाने विश्वसात घेवून चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सनी जाधव यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे.
सलमान ऊर्फ सल्ल्या शेख हा आदेश बिरामणे टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, मारामारी अशा प्रकारचे एकुण ७ गुन्हे सहकारनगर व भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्याच्यावर आता पर्यंत १ वेळा मोका कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच वैभव ऊर्फ बबलू कोठारी त्याच्यावर मारामारीचा एक गुन्हा सहकारनगर पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक राहुल खंडाळे करीत आहेत.
सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सुशांत फरांदे, निलेश शिवतारे, संजय गायकवाड, महेश मंडलिक यांच्या पथकाने केली.