पुणे – करोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला असून, गेल्या 24 तासांत शहरात एकाही बाधिताच्या मृत्यूची नोंद नाही. हद्दीबाहेरील 5 मृतांची नोंद मात्र करण्यात आली आहे.
याशिवाय 67 नव्या बाधितांची नोंद झाली असून, 93 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत झालेल्या 35 लाख 60 हजार 320 संशयितांच्या टेस्टमध्ये 5 लाख 4 हजार 397 जण बाधित आढळले. त्यातील 4 लाख 94 हजार 663 बाधित बरेही झाले. परंतु 9 हजार 74 जणांना प्राणास मुकावे लागले. सक्रीय बाधितांची संख्या कमी होत असून, सध्या ती 660 आहे.