पुणे – मनात काही करून दाखवायचं ठरवलं तर त्यासाठी वय कधीच अडथळा ठरत नाही. असचं काहीस पुण्यातील १६ वर्षीय युवक प्रथमेज जाजू याने करून दाखवलं आहे. प्रथमेशने बनवलेली चंद्राची प्रतिमा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रथमेशने चंद्राची अशी एक प्रतिमा बनवली की, जी अत्यंत क्लिअर असून माहितीपूर्ण आहे. त्याने ५० हजारहून अधिक फोटो घेतल्यानंतर एक थ्री-डायमेंशनल शॉट तयार केला आहे. यासाठी सुमारे १८६ जीबी हून अधिक डेटाचा वापर करण्यात आला. प्रथमेशने सांगितल्यानुसार त्याने शेअर केलेला फोटो मिनरल मूनच्या तिसऱ्या सत्रातील सर्वात माहितीपूर्ण आणि क्लिअर शॉट आहे.
एका मुलाखतीत प्रथमेशने सांगितलं की, त्याने शेअर केलेला फोटो दोन वेगवेगळ्या फोटोंचा एक HDR कंपोसाईट आहे. या फोटोला ३-डायमेंशनल इफेक्ट देण्यासाठी हे करण्यात आलं. या प्रक्रियेसाठी सुमारे १०० जीबी रॉ डेटा होता. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो १८६ जीबी झाला. मी हा डेटा एकत्र केल्यानंतर तो ६०० एमबीपर्यंत पोहोचला. ३ मे रोजी दुपारी १ वाजता मी फोटो क्लिक केले. त्यानंतर व्हिडीओ आणि फोटोसोबत ४ तास प्रक्रिया चालल्याचे प्रथमेशने सांगितले.
प्रथमेश पुढे म्हणाला की, संपूर्ण प्रक्रियेसाठी ३८ ते ४० तास कालावधी लागला असून ५० हजार फोटो क्लिक केले. चंद्राची साफ आणि स्पष्ट प्रतिमा यावी म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात फोटो क्लिक केले. या सर्व फोटोंना एकत्र करून चंद्राचा सर्वात साफ फोटो तयार केल्याचे प्रथमेशने म्हटलं आहे.
View this post on Instagram
ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी प्रथमेशने अनेक आर्टिकल वाचले आणि व्हिडीओ पाहिले होते. प्रथमेश म्हणतो की, त्याला एस्ट्रोफिजीक्स व्हायचं आहे. तसेच तो एस्ट्रोनॉमीचा अभ्यास करू इच्छितो. मात्र सध्या तरी एस्ट्रो फोटोग्राफी छंद म्हणून करत असल्याचे त्यांने सांगितले.