तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांची सन २०२४-२५ या वर्षासाठी उप प्रांतपाल विनय भुजबळ, अध्यक्ष उद्धव चितळे व सर्व माजी अध्यक्ष असलेल्या समितीने दि. 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रमोद आण्णासाहेब दाभाडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
सचिव पदी नियुक्त झालेले प्रमोद दाभाडे हे तळेगाव दाभाडे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष असून गेली अनेक वर्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान राहिले आहे. त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांबरोबर दाभाडे यांनी उत्तम काम केले आहे. विशेषत: कोविड काळात औषधे, अन्न–धान्य वाटपामध्ये पुढाकार घेतला. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे वाटप करण्यात आघाडीवर होते.
यावेळी उपप्रांतपाल विनय भुजबळ यांनी क्लबच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच क्लब करत असलेल्या वाटचाली बद्दल समाधान व्यक्त केले. या बैठकीचे नियोजन व आभार विकास उभे यांनी मानले.