मुंबई – गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे अहोरात्र मनोरंजन करणारी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली “तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका लवकरच आता वेब सीरिजच्या रूपात येणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी या मालिकेचे लेखक अब्बास हिरापुरवाला यांना ‘सध्या मनोरंजन विश्वामध्ये ओटीटीचा बोलबाला आहे, त्यामुळेच ही मालिका वेब सीरिजच्या रुपात येणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
मात्र, या प्रश्नावर उत्तर देताना अब्बास हिरापुरवाला म्हणाले होते की… ‘मला नाही वाटत की इतक्या मोठ्या मालिकेला आता वेब सीरिजच्या रुपामध्ये ओटीटीवर प्रसारित करता येईल. तसेही वेब सीरिज आणि मालिका पाहणार प्रेक्षक वर्ग वेगवेगळा आहे. त्यामुळेच जे जिथे आहे तिथेच राहणे योग्य आहे. गुलाबाचं फूल हे त्याच्यासारखेच असते. त्याला वेगळ्या रुपात मांडता येणार नाही. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका वेब सीरिजमधून येईल असं वाटत नाही.’ असं ते म्हणाले.
दरम्यान, अनेक दशकापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी या मालिकेचे सर्वाधिक भाग प्रसारित झाल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद सुद्धा झाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा पहिला भाग २८ जुलै २००८ मध्ये प्रसारित झाला होता.
या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि याच कारणामुळे प्रेक्षकवर्ग सुद्धा या मालिकेवर तितकेच प्रेम करत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.