मंचर- मंचर आणि परिसरातील हातावर पोट असणारे कामगार, गरीब कुटुंबे अन्नधान्यापासून वंचित आहेत. अशा गरजू लोकांना वस्तू रूपात मदत दिली जाईल.त्यासाठी संबधित गरजूंनी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योजक अजय घुले यांनी केले आहे.
रोजगार बुडल्याने त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा बिकट परिस्थितीमध्ये सापडलेल्या कटुंबांची भूक भागवण्याच्या अनुषंगाने मंचर आणि परिसरातील अशा गरजू कुटुंबांना काही दिवस पुरेल असा किराणा/खाद्य वस्तू देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. देण्यात येणाऱ्या वस्तू- तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, मीठ, चहा पावडर, साखर, दूध, बटाटे, कांदा,भाजीपाला इत्यादींसाठी अजय घुले 7588945286, प्रशांत घुले 9890767695, सुजय बेंडे 9960370397, गार्गी वळसे पाटील 9503830419 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहेत.