पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांनी कायमच माझ्यावर प्रेम केले आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केली.
दिशा फाउंडेशनच्या वतीने अभिनेते भरत जाधव यांचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
एका नाटकाच्या प्रयोगाप्रसंगी मोजक्या रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत भरत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भरत जाधव यांची पत्नी सरिता जाधव, ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, मनोज ढाकणे, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिन साठे, विजय कांबळे, अविनाश ववले आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जाधव यांनी पिंपरी-चिंचवडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.