मुंबई – ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात छोटया पूजाचे पात्र साकारलेली अभिनेत्री मालविका राज चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता मालविकाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. मालविकाने नुकताच साखरपुडा केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री मालविकाने इनस्टाग्रामवर फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने बिझनेसमॅन प्रणव बग्गासोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “आम्ही सध्या तुर्कीतील कॅपाडोशियामध्ये आहोत. आम्ही येथे नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. खूप दिवसानंतर ती वेळ आली आहे, आम्ही त्यासाठीच येथे भेटलो आहोत.”
या फोटोमध्ये अभिनेत्री मालविका राजने सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला. तर पती आणि बिझनेसमॅन प्रणव बग्गाने देखील पांढरा रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. दोघांनीही मॅचिंग ड्रेस घातल्यामुळे ते खूपच सुंदर दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये प्रणव गुडघ्यावर बसून मालविकाला प्रपोज करताना दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मालविका ‘स्क्वाड’ चित्रपटात शेवटची दिसली होती. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तर प्रणव बग्गा हा बिझनेसमॅन आहे.