नवी दिल्ली -देशातील इंधनाच्या दरातील वाढ सुरूच असून आज शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 30 पैसे आणि डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ झाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 109 रूपये 54 पैसे इतका झाला असून डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. गेले लागोपाठ तीन दिवस इंधन दरवाढ होते आहे.
इंधनाच्या दरात सतत होणाऱ्या वाढीवर सरकारने तीन आठवडे नियंत्रण आणले होंते. पण 28 सप्टेंबर नंतर पुन्हा ही वाढ करण्यास सरकारने तेल कंपन्यांना अनुमती दिली.
त्यानंतरच्या अवधीत आत्तापर्यंत डिझेलच्या दरात साडे तीन रूपये आणि पेट्रोच्या दरात 2 रूपये 35 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्या आधी 4 मे ते 17 जुलै या अवधीत पेट्रोलचे दर 11 रूपये 44 पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर या अवधीत 9 रूपये 14 पैशांनी वाढले आहेत.