BARAMATI : बारामती आणि गोविंदबागेत (Govindbaug) साजरी होणारी दिवाळी हा राज्यभर चर्चेचा विषय असतो. दिवाळीच्या दिवशी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निवासस्थानी उपस्थित राहून कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना भेटण्यासाठी उपस्थित असतात. सध्या राष्ट्रवादीमध्ये (Ncp) सुरु असलेलं गटातटाचे राजकारण पाहता यंदा गोविंद बागेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Supriya Sule share Family Photo)
अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील राजकारण खूपच ढवळून निघालं होत. अशात अजित पवार यंदाच्या दिवाळीला शरद पवारांसोबत गोविंदबागेत दिसणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. मात्र अजित पवार यंदा गोविंदबागेत अनुपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.
दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब (Pawar Family) दरवर्षी एकत्र येत. यंदा देखील संपूर्ण कुटुंब एकसाथ आलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेसचा फोटो देखील शेअर केला. या फोटोमध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय पाहायला मिळत आहेत. मात्र यावेळी देखील अजित पवार अनुपस्थित होते. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मात्र याठिकाणी उपस्थित होत्या.
View this post on Instagram
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जेवणासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. त्यात सुनेत्रा पवार म्हणजेच अजित पवारांच्या पत्नीही दिसल्या. मात्र अजित पवार फॅमिली फोटोत दिसले नाही. सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या या फोटोजची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.