पिंपरी, (प्रतिनिधी) – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या सीईओपदी पमेश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे.गेली 25 वर्षांपासून पमेश गुप्ता अनेकमोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच व्यवसाय धोरणे विकसित करण्यात तसेच परिवर्तन व्यवस्थानावर भर देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत.
पमेश गुप्ता यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग, युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून मास्टर इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी मॉन्ट्रियलमधून एमबीए केले आहे.
गेली 8 वर्षे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ पद सांभाळणार्या रेखा दुबे यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनेक औद्योगिक संस्थांकडून प्रमाणित करण्यात आलेल्या या हॉस्पिटलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाले आहेत.