मॉस्को – रशिय-युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले आहे. यामुळे युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका, युरोपसह जगभरातील काही देश एकजूट झाल्याचे दिसून येत आहे. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची मात्र नाचक्की झाली आहे.
या युद्धाच्या धामधुमीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाच्या भेटीला गेले आहेत. पण त्यांचे स्वागत करायला कोणताही मोठा अधिकारी उपस्थित राहिला नाही. जो अधिकारी उपस्थित होता, त्याने इम्रान खान यांचे स्वागत तर केले पण “आपण आता उद्या भेटू या’, असे सांगत त्यांचा लगेच निरोप घेतला.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियाला भेट दिल्यानंतर मॉस्को भेटीसाठी आपण खूप उत्साही असल्याचे सांगितले. आपण रशियाला भेट दिलेली वेळ ही एकदम परफेक्ट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मॉस्को विमानतळावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे स्वागत तर झाले. पण रशियन अधिकाऱ्याने लागोलाग त्यांना कारमध्ये बसवले.