इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी केल्या गेलेल्या हवेतील गोळीबारामुले किमान 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील काही मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारे गोळीबारात काही जण जखमी झालेल्याच्या घटना घडल्या आहेत. कराचीमध्ये अशा गोळीबारात जखमी होणाऱ्यांमध्ये काही लहान मुलांचा आणि महिलांचाही समावेश आहे.
शनिवारी मध्यरात्री नंतर सुरू झालेल्या आनंदोत्सवादरम्यान कराचीमध्ये ठिकठिकाणी हवेत गोळीबार केला गेला. या गोळीबाराचे आवाज संपूर्ण कराची शहरामध्ये घुमले होते. या होळीबारात एका लहान मुलासह महिला आणि अन्य काही जण जखमी झाले असल्याचे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
सरकारी रुग्णालयात 8, जिना हॉस्पिटलमध्ये 4 आणि अब्बासी शाहिद हॉस्पिटलमध्ये महिला आणि लहान मुले मिळून 10 जणांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. गो गोळीबारप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली असून त्यातील तिघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अतिउत्साहामध्ये हवेत गोळीबार करण्याच्या घटना लाहोर, इस्लामाबाद आणि रावळपिंडी शहरांमध्येही घडल्याचे वृत्त आहे.