इस्लामाबाद :- इराणमधून स्वस्तात गॅस आयात करण्यासाठी उभारण्यात येणारा अब्जावधी डॉलरचा गॅस पाइपलाइन प्रकल्प पाकिस्तानने तात्पुरता रद्द केला आहे. अमेरिकेकडून येत असलेल्या दबावामुळे पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
इराणच्या आण्विक कार्यक्रमामुळे अमेरिकेने इराणवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले आहेत, अशी माहिती पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी दिली आहे.
आर्थिक आपत्तीत सापडलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीची अपेक्षा आहे. नाणेनिधीने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले असतानाच पाकिस्तानला हा प्रकल्प रद्द करावा लागला आहे.
हा प्रकल्प भारत-इराण आणि भारताच्या संकल्प असलेला प्रकल्प होता. मात्र नंतर भारत या प्रकल्पातून बाहेर पडला आणि हा प्रकल्प केवळ पाकिस्तान आणि इराणचा द्विपक्षीय प्रकल्प राहिला होता. आता तर पाकिस्ताननेही या प्रकल्पातून माघार घेतली आहे. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या फोर्स माजेयुरे ऍन्ड एक्सक्युजिंग इव्हेंट या इराणमधील कंपन्यांना कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावली आहे.
पाकिस्तानला उर्जेची कमतरता असतानाही इराणबरोबरचा हा गॅस लाईन प्रकल्प गेल्या दशकभरापासून रखडलेला होता. मात्र आता जोपर्यंत इराणवर अमेरिकेचे निर्बंध आहेत, तोपर्यंत पाकिस्तानला या प्रकल्पाला मंजूरी देता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानची उर्जेची समस्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे.