जगातील प्रत्येक देशात असे अनेक विचित्र कायदे आहेत जे लोकांना आश्चर्यचकित करण्यासोबतच त्यांचे मनोरंजनही करतात. शेजारी देश पाकिस्तानमध्येही अनेक विचित्र कायदे आहेत. या बाबतीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. या विचित्र कायद्यांमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे. काही महिन्यांपूर्वीच एका कायद्यावर बरीच टीका झाली होती.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एक विचित्र विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक जगभरात चर्चेचा विषय बनले होते. या विधेयकात 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लोकांना लग्न सक्तीचे करण्यात यावे, असे म्हटले होते. याशिवाय या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षेचीही तरतूद आहे. पाकिस्तानी राजकारण्यांचा असा युक्तिवाद आहे की यामुळे सामाजिक दुष्कृत्ये आणि बाल बलात्कार रोखण्यास मदत होईल. चला जाणून घेऊया पाकिस्तानच्या अशाच काही अजब कायद्यांबद्दल.
१. परवानगीशिवाय फोनला स्पर्श करू शकत नाही
परवानगीशिवाय एखाद्याच्या फोनला स्पर्श करणे पाकिस्तानमध्ये बेकायदेशीर मानले जाते. चुकूनही कोणी दुसऱ्याच्या फोनला हात लावला तर शिक्षेची तरतूद आहे. असे करणाऱ्याला ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो.
२. इंग्रजी भाषांतर बेकायदेशीर आहे
पाकिस्तानमध्ये तुम्ही काही शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करू शकत नाही. या शब्दांचे इंग्रजीत भाषांतर करणे बेकायदेशीर मानले जाते. हे शब्द अल्लाह, मस्जिद, रसूल किंवा नबी आहेत. जर कोणी त्यांचे इंग्रजीत भाषांतर केले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते.
३. शिक्षण शुल्कावर कर आकारला जातो
पाकिस्तानमध्ये शिकण्यासाठी तुम्हाला कर भरावा लागेल. जर एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासावर 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केला तर त्याला 5% कर भरावा लागेल. कदाचित याच भीतीपोटी पाकिस्तानातील लोक कमी अभ्यास करतात.
४. लग्नापूर्वी मुलगा-मुलगी एकत्र राहू शकत नाहीत
जर एखादा मुलगा प्रेयसीसोबत राहत असताना पकडला गेला तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होते. इथे कुणाही मुलीशी मैत्री करता येत नाही. लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी एकत्र राहू शकत नाही असा कायदा शेजारील देशात आहे.
५. ‘येथे’ जाण्यास बंदी आहे
पाकिस्तानचा कोणताही नागरिक इस्रायलमध्ये जाऊ शकत नाही, कारण तेथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. इस्रायलला भेट देण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून व्हिसा दिला जात नाही.