वॉशिंगटन – अमेरिकेतील ऍरिझोना प्रांतातील वाळवंटामध्ये एके ठिकाणी तब्बल चार हजार चारशे विमाने पार्क करून ठेवण्यात आली असून या जागेला विमानांची स्मशानभूमी म्हणून ओळखले जाते या जागेमध्ये केवळ विमाने ठेवण्यात आली आहेत असे नाही.
तर काही अवकाश या यानेही या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आली आहेत बोनयार्ड नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जागेला विमानांची स्मशानभूमी मानली जाते या स्मशानभूमीत प्रवासी विमानाशिवाय युद्धात वापरली जाणारी बॉम्बर विमाने आणि इतर सर्व प्रकारची विमाने ठेवण्यात आली आहेत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेली अनेक विमाने या ठिकाणी पाहायला मिळतात त्याशिवाय काही बॉम्बर विमाने ठिकाणी उभी करून ठेवण्यात आली आहेत.
अमेरिकेच्या हवाई दलाचा एक खास विभाग या जागेवर लक्ष ठेवून आहेत या ठिकाणी काही कर्मचारी तैनात करण्यात आले असून जी विमाने दुरुस्त करणे शक्य आहेत ती विमाने दुरुस्त केली जातात ज्या विमानांमध्ये कोणत्या प्रकारची दुरुस्ती शक्य नाही त्या विमानांचे स्पेअर पार्ट काढून जगात ठीकठिकाणी विक्रीसाठी पाठवले जातात या जागेवर तब्बल 800 तंत्रज्ञ 24 तास काम करत असतात.
या बोनयार्ड मध्ये उभ्या करण्यात आलेल्या सर्व विमानांची एकूण किंमत तब्बल 35 अब्ज डॉलर्स एवढी आहे दुसऱ्या महायुद्धानंतर 1946 मध्ये या प्रकल्पची सुरुवात करण्यात आली आणि नादुरुस्त झालेली विमाने या ठिकाणी ठेवण्यास प्रारंभ करण्यात आला फुटबॉलची तब्बल दोन हजार मैदाने एकत्र केल्यावर जेवढी जागा निर्माण होईल तेवढ्या जागेत हा हवाई तळ बांधण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ही सर्व विमाने ठेवण्यात आली आहेत.
या प्रदेशातील हवामानाचा विचार करता या ठिकाणी विमानांच्या पार्ट्सना गंज लागण्याचा धोका खूपच कमी असल्याने विमानांची स्मशानभूमी म्हणून या जागेचा निवड करण्यात आली या स्मशानभूमीमध्ये विविध 80 प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवण्यात आली आहेत