मांजरी (पुणे) – माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगरचे माजी सरपंच संदीप लोणकर यांच्याकडून विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन कि बात कार्यक्रम, जेष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप, सत्कार समारंभ, २०२३ कॅलेंडर प्रकाशन व वाटप, स्नेहभोजन असे विविध उपक्रम केशवनगरमधील अमृतेश्वर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात संपन्न झाले.
यावेळी भाजप हडपसर विधानसभा माजी अध्यक्ष सुभाष जंगले, उपाध्यक्ष अविनाश मगर, अमृतेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी अध्यक्ष सखाराम भोसले, खजिनदार शिवजी सूर्यवंशी, प्रवीण बावधनकर, रवींद्र जतकर, वासुदेव शिंदे, शिवराम सोमवंशी, दत्तात्रय घुमे, सुरेश कुंजीर, रविंद्र बलकवडे, बाळकृष्ण रेळेकर, दत्तात्रय भंडारे, कैलास चौधरी, त्रिभुवन विनायक यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करत संदीप लोणकर यांच्या उपक्रमांचे कौतुक करून माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे अभिष्टचिंतन केले. जेष्ठ नागरिकांना यावेळी ओळखपत्र वाटप करण्यात आले. माजी सरपंच संदीप लोणकर यांच्या २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते झाले. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप लोणकर मित्र परिवाराने परिश्रम घेतले.