व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यु ट्यूब (YouTube) लवकरच एक नवीन बदल करणार आहे, ज्यामध्ये सर्व वापरकर्त्यांना त्यांचे स्वतःचे अकाउंट हँडल असेल. यु ट्यूब लवकरच हे फीचर आणण्याची तयारी करत आहे. या फीचरमध्ये इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) आणि टिकटॉक (TikTok) सारख्या प्लॅटफॉर्मप्रमाणे, वापरकर्त्याचे स्वतःचे अकाउंट हँडल असेल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते इतर कोणत्याही वापरकर्त्याचा मेन्शन करू शकतील. गुगलच्या मालकीच्या कंपनीच्या या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. लवकरच युजर्ससाठी रिलीझ केले जाऊ शकते.
यूट्यूबनेच या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की आम्ही क्रिएटर्सना त्यांचा कन्टेन्ट योग्यरित्या डिझाइन करण्यासाठी आणि दर्शकांशी संवाद साधण्यासाठी एक नवीन फिचर आणत आहोत. हे फिचर निर्मात्यांना दर्शकांच्या पसंती जाणून घेण्यास आणि त्यानुसार कन्टेन्ट तयार करण्यास मदत करतील.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या क्रिएटर्स त्यांच्या चॅनेलच्या नावाने ओळखले जातात, आता त्यांच्याशी अकाउंट हँडलद्वारे संवाद साधला जाऊ शकतो, यामुळे वापरकर्ते आणि निर्माते यांच्यात अधिक चांगला संवाद होईल. अकाउंट हँडल रोल आउट झाल्यानंतर, सर्व यु ट्यूब क्रिएटर्स आणि यूजर्सचे स्वतःचे यु ट्यूब हँडल असेल.
यूट्यूबचे हे फीचर लवकरच आणले जाणार आहे. कंपनी वापरकर्त्यांना त्यांचे हँडल निवडण्यासाठी सूचित करेल. वापरकर्ते त्यांच्या पसंतीच्या नावासह त्यांचे हँडल निवडू शकतात. जर, एखाद्या वापरकर्त्याकडे आधीपासूनच या नावाचे हँडल असेल, तर त्याला इतर पर्यायांमधून नाव निवडण्याची सुविधा देखील मिळेल.