पुणे,दि. 11 – लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत तरुण, तरुणींना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमण्यात आले. लोणीकाळभोर येथे झालेले कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशीक विभाग) नामदेव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज कपूर हायस्कुल लोणीकाळभोरचे प्रांगणात उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी उपायुक्त नम्रता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते., वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस निरीक्षक तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी,तसेच परिसरातील पोलीस पाटील हे उपस्थित होते.
लोणी काळभोर, उरुळीकांचन, उरुळीदेवाची येथील मिळून 100 युवक/युवती हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला मदत करणार आहेत.सध्या चालू असणारे करोना प्रतिबंधक उपाय योजनेमध्ये या विशेष पोलीस अधिकारी यांची लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला मोठी मदत होणार आहे.
लोणीकाळभोर,कदमवाकवस्ती,थेउर,कुंजीरवाडी,उरुळीकांचन,उरुळीदेवाची,येथील युवक/युवती स्वेच्छेने विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणार आहेत.