MP Prataprao Jadhav| नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान पदासाठीचा त्यांचा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर राज्यातील काही जणांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.
यात राज्यातील भाजपचे नेते नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, तर आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले, शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची शक्यता आहे. तसेच इतर काही नेत्यांची देखील मंत्रीपदासाठी नावं चर्चेत आहे. त्या अनुषंगाने एनडीए सरकारमधील उच्चपदस्थ नेत्यांनी फोन केल्याचे समोर आले आहे.
मंत्रीपदासाठी कोणत्या नेत्यांची चर्चा ?
राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, नितिन गडकरी, जयंत चौधरी, चिराग पासवान, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, पियूष गोयल रामदास आठवले,जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाकडून मंत्रीपद मिळण्याची शक्यता असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांच्या राजकीय प्रवासाबाबत जाणून घेऊयात. MP Prataprao Jadhav|
कोण आहेत प्रतापराव जाधव ?
प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास दिल्लीपर्यंत पोहचला आहे.
प्रतापराव जाधव यांचा राजकीय प्रवास
प्रतापराव जाधव यांनी सलग तिसऱ्या टर्ममध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत आहे. प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हीची हॅटट्रिक करण्याचा पराक्रम साधला आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
शिवसेनेने प्रतापराव जाधवांना 2009 साली त्यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. ज्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतापराव जाधव विजयी ठरले आहेत. त्यांनी संसदीय समितीत सदस्य म्हणून देखील काम सांभाळले आहे. त्यामुळे यावेळी त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
मोदी ३.० सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ; कोण आहेत राम मोहन नायडू?